शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं दुबईमध्ये आकस्मिक निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं निधन झालं असून ते आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी सहकुटुंब दुबईला गेले होते तेव्हाच हा प्रकार घडला असून या वृत्तामुळे शिवसैनिकांना मोठा धक्का बसलाय. ही बातमी समोर आल्यानंतर अंधेरीमधील लटके यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झालीय. असं असतानाच दुसरीकडे राजकीय श्रेत्रातील व्यक्तींकडूनही लटके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय. भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यासहीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील ट्विटरवरुन लटके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

नक्की वाचा >> दुबईत शिवसेना आमदाराचं निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं, “त्यांच्या निधनामुळे…”

अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरुन लटके यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. “शिवसेनेचे अंधेरी पूर्व (मुंबई) चे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! लटके परिवार व शिवसैनिकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो,” असं अमोल कोल्हेंनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलंय.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
parbhani lok sabha marathi news, shivsena parbhani lok sabha marathi news, sanjay jadhav parbhani loksabha marathi news
पस्तीस वर्षात ‘धनुष्यबाण’ चिन्हाशिवाय बालेकिल्ल्यातील शिवसेनेची पहिलीच निवडणूक

बुधवारी रात्री अचानक लटके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रमेश लटके हे ५२ वर्षांचे होते. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, “आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिलीय.

दरम्यान, लटके यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देतानाृ नितेश राणे यांनी लटके यांच्या निधनाने धक्का बसल्याचं ट्विटरवरुन म्हटलंय. “शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल ऐकून धक्का बसला. काही महिन्यांपूर्वीच आंगणेवाडीच्या जत्रेला जाताना कोकणात जाणाऱ्या विमानात त्यांची भेट झेली होती. डायएटींगच्या माध्यमातून त्यांनी वजन कमी केल्याबद्दल मी त्यांचं कौतुक केलं होतं. पक्षापलीकडे जाऊन ते एक चांगले मित्र होते. हे सारं अविश्वनीय आहे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी नोंदवलीय.

२०१४ मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना पराभूत करुन लटके हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या एम पटेल यांना पराभूत केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होते.