मुंबई…म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून बर्याच वर्षांनंतर मुंबईतील दुकानांची विक्री करण्यात येत आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई लिलावसाठी मंगळवारी, २७ फेब्रुवारीला वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर १ मार्चपासून इच्छुकांना संगणकीय पद्धतीने नोंदणी, अर्ज, कागदपत्रे सादर करता येणार असून २० मार्चला ई लिलावाचा निकाल जाहिर केला जाणार आहे. म्हाडाच्या सोडतीप्रमाणे ई लिलावाचीही संपूर्ण प्रक्रिया संगणकीय करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना म्हाडात येण्याची गरज भासणार नसून ई लिलाव पारदर्शकत पद्धतीने पार पडणार असल्याचा दावा यानिमित्ताने मुंबई मंडळाकडून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या म्हाडा प्राधिकरणाला या ई लिलावातून किमान सव्वाशे कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबई :महारेराच्या कारवाईलाही विकासक घाबरेनात; जून २०२३ मधील ५५७ विकासकांकडून कोणताही प्रतिसाद नाही

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात रहिवाशांच्या गरज लक्षात घेता काही दुकानेही बांधली जातात. या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने म्हाडाकडून केली जाते. दुकानांसाठी म्हाडाकडून निश्चित अशी बोली लावली जाते आणि या बोलीपेक्षा जो कोणी अधिक बोली लावेल त्याला दुकान वितरीत केले जाते. अशाप्रकारे आतापर्यंत मुंबईतील शेकडो दुकानांचा ई लिलाव करण्यात आला आहे. परडवणाऱया दरात दुकान घेता येत असल्याने या ई लिलावाला चांगला प्रतिसादही मिळतो. मात्र मागील काही वर्षात दुकानांची विक्रीच झालेली नाही. तेव्हा मोठ्या खंडानंतर मुंबई मंडळाने २०२३ मध्ये दुकानांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि आता या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. मगंळवारी, २६ फेब्रुवारीला ई लिलावासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

हेही वाचा >>> मुंबई: पालिका अधिकाऱ्याला शिवसेनेच्या शाखा प्रमुखाकडून मारहाण

मुंबईतील १७३ दुकानांच्या ई लिलावासाठीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला १ मार्चला सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे. तर अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत १४ मार्चला संपुष्टात येईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडत २० मार्चला सकाळी ११ वाजता ई लिलावाचा निकाल जाहीर केला जाईल असेही या अधिकार्याने सांगितले. दरम्यान या ई लिलावात २५ लाखांपासून ते १३ कोटी रुपयांपर्यंतची बोली निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या ई लिलावातून किमान १२५ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा मंडळाला आहे.

…..

कुठे किती दुकाने

ठिकाण- एकूण दुकानांची संख्या

प्रतिक्षानगर, शीव- १५

न्यू हिंद मिल, माझगांव- ०२

स्वेदशी मिल, कुर्ला-रु. ०५

गव्हाणपाडा, मुलुंड- ०८

तुंगा पवई- ०३

मजावाडी, जोगेश्वरी -०१

शास्रीनगर, गोरेगाव- ०१

सिद्धार्थनगर, गोरेगाव- ०१

बिंबिसार नगर, गोरेगाव- १७

मालवणी, मालाड- ५७

चारकोप, भूखंड क्रमांक१- १५

चारकोप, भूखंड क्रमांक २-१५

चारकोप, भूखंड क्रमांक ३-०४

जुने मागाठाणे, बोरीवली-१२ महावीर नगर, कांदिवली-१२