मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कजवळील एल. जे. मार्गावर उभ्या असलेल्या एका टॅक्सीवर बुधवारी सकाळी अचानक झाड पडले. या दुर्घटनेत टॅक्सीचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी टॅक्सीचालकाचे नाव सलमान खान (३५) असे आहे.

संबंधित दुर्घटना सकाळी १० च्या सुमारास घडली. संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. तसेच, टॅक्सीत अडकलेल्या जखमी वाहनचालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी त्याला तात्काळ नजीकच्या वांद्रे भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सलमान खान यांच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत टॅक्सीचेही मोठे नुकसान झाले.