मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या कल्याण – कसारा तिसऱ्या मार्गाच्या पायाभूत कामासाठी तानशेत स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे शनिवारी रात्री सीएसएमटी – कसारा लोकल आणि रविवारी पहाटे कसारा – सीएसएमटी लोकल विलंबाने धावतील.
कधी – शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.१५ दरम्यान.
परिणाम
ब्लाॅकमुळे या रेल्वेगाड्या उशिराने धावतील.
गाडी क्रमांक १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमृतसर एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया एक्स्प्रेस
गाडी क्रमांक २२१७७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
गाडी क्रमांक २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १८०३० शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
गाडी क्रमांक २०१०४ आजमगढ – लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस
गाडी क्रमांक ११००२ बल्हारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदिग्राम एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२१५२ शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्स्प्रेस
गाडी क्रमांक १२११२ अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस
या रेल्वेगाड्यांचा प्रवास कालावधी वाढेल
गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस ४० मिनिटे थांबविण्यात येईल. त्यामुळे या रेल्वेगाडीचा प्रवास कालावधी वाढेल.
गाडी क्रमांक १७०५८ लिंगमपल्ली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देवगिरी एक्स्प्रेस १५ मिनिटे उशिराने धावेल.
गाडी क्रमांक १२६१८ हजरत निजामुद्वीन – एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२१३८ फिरोजपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंजाब मेल १५ ते २० मिनिटे विलंब होईल.
या लोकल विलंबाने धावतील
शनिवारी रात्री १०.४७ आणि रात्री १२.०८ ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा लोकल विलंबाने धावेल. तसेच रात्री ३.५१ आणि पहाटे ४.५९ ची कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल उशिराने धावतील.
प्रशासनाचे आवाहन
प्रवाशांच्या हितासाठी हे पायाभूत ब्लॉक घेतण्यात येत आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.