मुंबईतल्या लालबाग भागात मुलीनेच आईची हत्या केल्याच्या प्रकरणात एका तरूणाला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून एका तरूणाला ताब्यात घेतलं आहे. या तरूणाला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्या तरूणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. मुंबईतल्या लालबाग भागात २३ वर्षांच्या एका मुलीने आईची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे तीन महिने घरातच ठेवले होते. या मुलीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातून एका तरूणाला ताब्यात घेण्यात आलं आहे तरूण या मुलीच्या संपर्कात होता असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

लालबागमध्ये काय घडला प्रकार?

मुंबईतल्या लालबाग या ठिकाणी एका इमारतीत वीणा जैन यांची त्यांची मुलगी रिंपलने केली. या प्रकरणात रिंपल ही एका सँडविच विकणाऱ्या तरूणाच्या संपर्कात होती असं पोलीस तपासात समोर आलं आहे. याआधारे मुंबई पोलिसांनी शोध घेतला असता हा तरूण उत्तर प्रदेशात असल्याचं पोलिसांना समजलं. त्या तरूणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतल्या लालबाग या ठिकाणी मुलीने तिच्या आईची हत्या केली. त्यानंतर आईच्या मृतदेहाचे तुकडेही केले. हे तुकडे या मुलीने कपाटात, फ्रिजमध्ये, पाण्याच्या ड्रममध्ये ठेवले होते. मंगळवारी रात्री लालबागच्या एका घरातून तुकडे तुकडे झालेला हा मृतदेह बाहेर काढला गेला तेव्हा या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. कारण आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मुलगी त्याच घरात राहात होती. या मुलीने एक-दोन दिवस नाही तर तीन महिने या मृतदेहाच्या तुकड्यांसोबत काढले. वीणा जैन असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर रिंपल जैन असं पोलिसांनी अटक केलेल्या तरूणीचं नाव आहे.

ही घटना नेमकी कशी उघडकीस आली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रिंपलचा चुलत भाऊ तिच्या घरी पैसे देण्यासाठी गेला होता. तेव्हा वीणा जैन दिसत नसल्याने कुठं आहे, असं भावाने रिंपलला विचारलं. तर, ती कानपूरला गेल्याचं तिने म्हटलं. पण, संशय आल्याने त्याने रिंपलला दरवाजा उघडण्यास सांगितलं. जेव्हा तो घरात गेला, त्याला दुर्गंधी परसल्याचं लक्षात आलं.” त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. जेव्हा पोलिसांनी लालबागच्या या घरातून तुकडे झालेला वीणा जैन यांचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा शेजाऱ्यांना आश्चर्य वाटलं की तीन महिने आपल्याला काहीच कसं कळलं नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीने आईला का ठार केलं?

पोलिसांनी हे प्रेत वीणा जैन यांच्या नातेवाईकांना दाखवलं तेव्हा त्यांनी प्रेताची ओळख पटवली. यानंतर हे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सुरूवातीला पोलिसांनी रिंपलला या घटनेबाबत विचारलं तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. तिने असंही सांगितलं की आईचा मृत्यू आपोआप झाला. मात्र पोलिसांनी जेव्हा विचारलं की आईच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात आणि इतर ठिकाणी कसे पोहचले त्याची उत्तरं रिंपलला देता आली नाहीत. यानंतर वीणा जैन यांची मुलगी रिंपलला अटक करण्यात आली आहे. तिने हत्या का केली? कधी केली? तुकडे कसे केले? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळणं बाकी आहे. तीन महिने ती या प्रेताच्या तुकड्यांसोबत राहात होती हे देखील पोलिसांनी सांगितलं.