मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गरीब रथ एक्स्प्रेस सुटली आणि वेग घेणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न एक प्रवासी करीत होती. मात्र एक्स्प्रेसचा वेग वाढला प्रवाशाचा तोल सुटला. प्रवासी फलाट आणि रेल्वेगाडीदरम्यान असलेल्या पोकळीत पडला. यावेळी कर्तव्यावरील आरपीएफ जवानाने तातडीने प्रवाशाला पकडले आणि त्याचे प्राण वाचवले. ही घटना स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आरपीएफ काॅन्स्टेबल राम नारायण सिंह यांनी वेळीच प्रसंगावधानता दाखविल्याने प्रवाशाचे प्राण वाचले.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर ३० मे रोजी फलाट क्रमांक ४ वर गाडी क्रमांक १२२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली गरीब रथ एक्स्प्रेस रवाना होत होती. यादरम्यान एक प्रवासी धावत्या रेल्वेगाडीमध्ये चढत असताना त्याचा तोल गेला. त्याच क्षणी प्रवासी फलाट आणि एक्स्प्रेसच्या पोकळीत पडणार होता. तेथे कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान राम नारायण सिंह यांनी धाडस दाखवत एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेतली आणि प्रवाशाला ओढून सुरक्षित ठिकाणी नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचे चित्रिकरण सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. त्यानंतर ही चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली. आरपीएफ जवान राम नारायण सिंह यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.