मुंबई : महसूलवाढीसाठी पालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलाव करण्यासाठी जारी केलेल्या निविदेला विकासकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिकेने या भूखंडाच्या लिलावासाठी अखेर पुनर्निविदा काढली आहे. या लिलाव प्रक्रयिेसाठी तीनपैकी मलबार हिलची जागा वगळून उर्वरित दोन जागांसाठी निविदा काढण्यात आली.

भूखंडांची आधारभूत किंमत पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. महसूल वाढीसाठी पालिकेने मुंबईतील तीन भूखंडांचा लिलाव करण्याचे ठरवले होते. कॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्टच्या रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा अशा तीन जागांचा लिलाव करण्याचे ठरवले होते. त्यासाठी निविदाही मागवल्या होत्या. मात्र यापैकी कोणीही निविदा भरली नाही.

मलबार हिल येथील जागेवर बेस्टचे विद्याुत उपकेंद्र असून बेस्टचा या जागेचा लिलाव करण्यास विरोध होता. त्यामुळे ही जागा लिलावातून वगळण्यात आली आहे.

आधी काढलेल्या निविदांमध्ये पूर्ण चटईक्षेत्र निर्देशांक गृहीत धरण्यात आला होता. त्यामुळे त्या भूखंडांची किंमत जास्त झाली होती. त्यामुळे अनामत रक्कमही वाढली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आता परिमंडळनिहाय चटईक्षेत्र निर्देशांक वापरून भूखंडाची आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे.

भूषण गगराणी, पालिका आयुक्त

● वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा १०,८०० चौरस मीटर आहे. या जागेची आधारभूत किंमत आधी २,०६९ कोटी ठरवण्यात आली होती. ती आता ७५५ कोटी झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● क्रॉफर्ड मार्केट येथील जागा ८,११६ चौरस मीटर आहे. या जागेच्या लिलावासाठी पालिकेने आधी किमान २,१७५ कोटी आधारभूत किंमत ठरवली होती. ती आता ४२८ कोटी ठरवण्यात आली आहे.