मुंबई : दिपावली साजरी करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. तसेच, फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. रात्री १० पर्यंत फटाके फोडावे, अशा सूचना पालिका प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आग अथवा तत्सम प्रसंग उद््भवल्यास तात्काळ मदत क्रमांक १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आहे.

दरवर्षी दीपोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. काही वेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटना घडतात. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा…फेअर प्ले ॲप प्रकरणात ईडीकडून मुंबई, गुजरातमधील आठ ठिकाणी छापे, चार कोटींची मालमत्ता जप्त

दिपावलीमध्ये रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडावे, या सूचनेचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे. तसेच कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे. फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावे. मुलांपासून फटाके लांब ठेवावेत व फटाके फोडणाऱ्या लहान मुलांसोबत मोठ्या व्यक्तींनी राहावे. त्यावेळी पादत्राणांचा वापर करावा. तसेच, फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ त्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे, अशा सूचना पालिकेतर्फे करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा…भाजपा प्रवक्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आणि प्रवेशाआधीच उमेदवारीही जाहीर; १२ तासांच्या आत सगळं घडलं!

फटाके फोडताना या बाबी टाळाव्यात

१. इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.

२. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.

३. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.

४. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.

५. विजेच्या तारा, गॅस वाहिनी किंवा वाहनतळाच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. घर, इमारत, परिसर इत्यादी ठिकाणी विद्युत रोशणाई करताना अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेचे विद्युत भार (ओव्हरलोड) होणार नाही, याची काळजी घ्यावी.