मुंबई : आग्रा येथील रहिवासी राम मंदिरावर हल्ला करणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. याबाबत सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून याबाबत यंत्रणा शोध घेत आहेत. शनिवारी मध्यरात्री पोलीस नियंत्रण कक्षाला एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव सोहम पांडे असल्याचे सांगून सोहेल कुरेशी नावाची व्यक्ती राम मंदिरावर हल्ला करणार असल्याचे सांगितले. आग्रा ते मुंबई प्रवासादरम्यान ही माहिती मिळाल्याचे सोहम याने सांगितले. कुरेशी हा आग्रा येथील अदपूतपूर येथील रहिवासी आहे. याशिवाय दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने कुरेशीचा मोबाईल क्रमांक व एका आरपीएफ कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांकही पोलिसांना दिला. याबाबत सर्व यंत्रणांना माहिती देण्यात आली.

या प्रकरणाशिवाय गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी आले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा : मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस – ठाकरे गटात संघर्ष

पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.