scorecardresearch

Premium

मुंबई : पोलिसांनी तीस तासात चोरांच्या मुसक्या आवळल्या; ४.०३ कोटी रुपये हस्तगत

आरोपींविरोधात कलम ४५४, ३९२, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mumbai police
(संग्रहित छायचित्र)

काळबादेवी येथील रामवाडी परिसरातील आदित्य हाईट्स या इमारतीतील के. डी. एम इंटरप्राइजेसच्या कार्यालयातील ४.०३ कोटी रुपये १० डिसेंबर रोजी चोरांच्या टोळीने लुटले होते. मुंबई पोलिसांनी केवळ तीस तासांत या गुन्ह्याची उकल करीत गुजरातमधून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आदित्य हाईट्स या इमारतीत १० डिसेंबर रोजी चोरांनी चोरी करण्याचा कट रचला. चोरांनी के. डी. एम इंटरप्राइजेसच्या कार्यालयात घुसून दोन इसमांना बांधून ठेवले आणि ४.०३ कोटी रुपयांची रक्कम लुटून पोबारा केला.

हेही वाचा >>> दिवाळीत विक्रमी उत्पन्न मिळाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

mumbai municipal corporation marathi news, mumbai 48000 illegal hoardings marathi news
मुंबईत गेल्या वर्षभरात ४८ हजार बेकायदा फलकांवर कारवाई, गुन्हा मात्र २२ प्रकरणांतच; कारवाईतील तफावतीवर उच्च न्यायालयाचे बोट
amount from cyber fraud re-deposited in bank accounts of citizens Vivek Phansalkar
सायबर फसवणुकीतील २४.५ करोड रुपये पुन्हा नागरिकांच्या बँक खात्यात जमा – विवेक फणसाळकर
pune gangsters interrogated at police commissionerate
पोलिसांनी पुण्यातील ‘भाईं’चा नक्षा उतरविला… गज्या मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह ३०० गुंडांची पोलीस आयु्क्तालयात चौकशी
pune gangsters interrogated at police commissionerate
पोलिसांनी पुण्यातील ‘भाईं’चा नक्षा उतरविला…गज्या मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह ३०० गुंडांची पोलीस आयु्क्तालयात चौकशी

या गुन्ह्याची माहिती मिळताच लोकमान्य पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधकार्यात पोलिसांनी खबऱ्यांची मदत घेतली. परिमंडळ २ मधील लोकमान्य टिळक पोलीस ठाणे, पायधुनी पोलीस ठाणे, व्ही. पी रोड पोलीस ठाणे आदी ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी विविध पथके तयार करून आरोपींचा तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी संपूर्ण रोकड घेऊन गुजरातमध्ये फरार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलीस पथके गुजरातच्या दिशेने रवाना झाली. अखेर पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले. तसेच ४.०३ कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. हर्षद ठाकूर (२६), राजुबा वाघेला (२१), अशोकभा वाघेला (२६), चरणभा वाघेलर (२६), मेहूलसिंग ढाबी (२४) आणि चिराग ठाकूर (२६) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात कलम ४५४, ३९२, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police solves rs 4 03 crore robbery case in thirty hours mumbai print news zws

First published on: 11-12-2023 at 22:11 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×