मुंबई पोलिसांना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला होता. या संशयित फोनवर बोलणाऱ्या इसमाने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आणि फोन कट केला. हा प्रकार दुसऱ्यांदा झाला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून याविषयी त्यांनी चौकशी सुरु केली आहे. या माणसाने असं सांगितलं की मला २६/११ शी संबंधित माहिती दिली जाते आहे. हा फोन कुणी केला होता याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

अर्धवट माहिती देऊन फोन कॉल केला कट

पोलिसांनी हे सांगितलं की रविवारी रात्री मुंबई पोलीस कंट्रोल रुममध्ये एक फोन आला. त्याने २६/११ चा उल्लेख करत फोन कट केला. यााधीही एक फोन आला होता त्यावेळी त्या माणसाने कुर्ला पश्चिम भागात स्फोट होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर रविवारी फोन आला, त्या माणसाने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचं सांगितलं तसंच २६/११ च्या हल्ल्याचा उल्लेख केला आणि फोन कट केला. त्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. ANI ने या विषयाचं वृत्त दिलं आहे.

पोलिसांसाठी हे कॉल ठरत आहेत डोकेदुखी

मुंबईतल्या कुर्ला भागात स्फोट होणार आहे अशी माहिती देणारा एक संशयित कॉल आला होता. एवढंच बोलून त्या फोन कॉलरने हा फोन कट केला होता. कुर्ला या ठिकाणी स्फोट होणार आहे हे समजल्यावर पोलिसांचं पथक त्या ठिकाणी गेलं होतं. कुर्ला भाग हा गर्दीचा आणि गजबजलेला आहे. पोलिसांच्या पथकाने सगळा शोध घेतला, मात्र पोलिसांना त्या ठिकाणी काहीही आढळलं नाही. आता पुन्हा एकदा फोन आल्याने पोलीस पुन्हा सतर्क झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी फेब्रुवारी महिन्यातही मुंबईत पुन्हा एकदा २६/११ सारखा हल्ला केला जाईल अशी धमकी देण्यात आली होती.