मुंबई : नवीन खरेदी केलेल्या वाहनाला पसंतीचा, आकर्षक वाहन क्रमांक घेण्याकडे अनेकांचा कल असतो. यासाठी वाहन मालिका खुली झाल्यानंतर, व्हीआयपी वाहन क्रमांक खरेदी केला जातो. मात्र, राज्य शासनाने व्हीआयपी वाहन क्रमांकांच्या किमतीत वाढ केल्याने पसंतीचा वाहन क्रमांकाची खरेदी कमी झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील चार आरटीओमध्ये ५,८१८ पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी करून १० कोटी रुपयांचा महसूल मिळून, महसुलात प्रचंड वाढ झाली आहे.

३० ऑगस्टपासून राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, व्हीआयपी वाहन क्रमांकांच्या किमतीत वाढ केल्याचे जाहीर केले. त्यामुळे, जारी झालेल्या राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, ०००१ क्रमांकाची किंमत चारचाकी वाहनांसाठी ५ लाख रुपये होईल. तसेच, दुचाकीसाठी ही रक्कम दुप्पट करून ती १ लाख रुपये केली.

हेही वाचा – मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत; ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका

याशिवाय, १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ आणि १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीच्या तुलनेत यावर्षी पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी करण्याची संख्या कमी झाली आहे. मात्र, महसुलात वाढ झाली आहे. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुंबईतील चार आरटीओमध्ये ६,२८५ पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी केला. तर, यावर्षी या कालावधीत चार आरटीओमध्ये ५,८१८ पसंतीचा वाहन क्रमांक खरेदी केले. तर, यामधून गेल्यावर्षी सुमारे ६.७१ कोटी महसूल मिळाला. तर, यावर्षी सुमारे १०.०४ कोटी महसूल मिळाला.

हेही वाचा – Mumbai Murder : मुंबईतल्या गोराईमध्ये मृतदेहाचे सात तुकडे आढळल्याने खळबळ, हातावरच्या टॅटूने गूढ वाढवलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन श्रेणींसाठी वेगवेगळे शुल्क

मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांत जास्त मागणी असलेल्या भागात ०००१ क्रमांकांची किमत चारचाकी वाहनांसाठी ४ लाखांवरून ६ लाख रुपयांपर्यंत वाढली. दुचाकी, तीनचाकी आणि इतर वाहन श्रेणींसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. पसंतीच्या वाहन क्रमांकाची किंमत ५ हजार रुपयांपासून ते ६ लाख रुपयांपर्यंत आहे. १६ पसंतीच्या चारचाकी वाहन क्रमांकाचे नवे शुल्क १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर, ४९ पसंतीच्या चारचाकी वाहन क्रमांकांचे शुल्क ५० हजार रुपयांवरून ७० हजार केले आहे. याशिवाय, १८९ पसंतीच्या वाहन क्रमाकांची रक्कम २५ हजार रुपयांपर्यंत आहे.