Mumbai Breaking News Updates, 31 July 2025 : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले आहे. तसेच, ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पुणे महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार असल्याचे आमिष दाखवून रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेने याबाबत सावध राहण्याचे आवाहन कंत्राटी कर्मचाऱ्यांना केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा यासह इतर मागणीसाठी २ ऑगस्टपासून नागपुरातून विविध जिल्ह्यांत मंडल जनगणना यात्रा काढण्यात येणार आहे.
Live Updates
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi: पुणे, मुंबई, मुंबई-महानगर, नागपूरच्या महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
निर्णयाची प्रत मिळवून तिचे विश्लेषण केल्यानंतर पुढील निर्णय; निकालानंतर एनआयएच्या अधिकाऱ्याची माहिती
एनआयएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता निर्णयाची प्रत मिळाल्यावर तिचे विश्लेषण केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. ...अधिक वाचा
१३ वर्षांच्या मुलीवर तीन सुरक्षा रक्षकांचा बलात्कार; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. ...सविस्तर वाचा
महापालिकेच्या २३ शाळांमध्ये गड-किल्ल्यांवर चित्रकला स्पर्धा; युनेस्कोचे भारतातील राजदूत विशाल शर्मा...
महापालिकेच्या शाळांमध्ये ३० जुलै रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी वरळीतील सी फेस शाळेतील स्पर्धेत विशाल शर्मा उपस्थित होते. ...सविस्तर वाचा
११ वातानुकूलित लोकल रद्द करण्याची मध्य रेल्वेवर नामुष्की; प्रवाशांना फटका
गुरुवारीही वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्याने मासिक पास असलेल्या प्रवाशांना पासाचे पैसे परत द्यावेत किंवा एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाने केली आहे. ...सविस्तर वाचा
मुंबईतील साडेबारा हजारांहून अधिक घरांची जुलैमध्ये विक्री; घरविक्रीतून ११०० कोटींहून अधिक महसूल
जुलैमध्ये एक हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. त्याचबरोबर मे आणि जूनच्या तुलनेत जुलैमध्ये महसुलातही मोठी वाढ झाली आहे. ...सविस्तर बातमी
अबब… सिडकोच्या एका चौरस मीटरला ७ लाख ६५ हजारांचा दर
सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच नेरुळ येथील पाच हजार चौरस मीटरच्या भूखंडाला ३८२ कोटी रुपयांचा दर इ - लिलाव पद्धतीने बोलीधारकांकडून लावण्यात आला आहे. प्रति चौरस मीटरला तब्बल ७ लाख ६५ हजार रुपयांचा दर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
...वाचा सविस्तर
रेल्वेने जोडली दोन श्रद्धास्थळे… साईनगर शिर्डी - तिरुपतीदरम्यान १८ विशेष सेवा
या रेल्वेगाड्यांमुळे दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे परस्परांशी जोडणी जाणार असून, साईबाबा आणि वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाची संधी प्रवाशांना मिळणार आहे. ...अधिक वाचा
मालेगाव बॉम्बस्फोट खटला निकाल : कडेकोट पोलीस बंदोबस्त, मुंबई सत्र न्यायालयाबाहेर गर्दी
ही सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर या खटल्याशीसंबंधित व्यक्ती व वकील पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केल्यानंतरच न्यायालयात प्रवेश दिला जात होता. ...वाचा सविस्तर
गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यामुळे प्रवासाचा कालावधी पाऊण तासाने वाचणार; प्रकल्पाच्या कामाला गती
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड १२.२ किमी लांबीचा आहे. या मार्गादरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४.७ किमी लांबीचा, तर फिल्मसिटीतून १.०२ किमीचा लांबीचा भुयारी रस्ता उभारण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
…अन्यथा कार्यकारी सहाय्यक पदाच्या निवड यादीतून वगळणार; अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना अंतिम संधी
अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा १४ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
जळगावमध्ये लाचखोरी सुरूच… महिला तलाठीने स्वीकारली २५ हजाराची लाच
वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
...अधिक वाचा
‘आपली चिकित्सा योजना’ १ ऑगस्टपासून पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत; योजना १०० आरोग्य संस्थांमध्ये करणार सुरू
महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. ...सविस्तर वाचा
गणेशोत्सवातील मंडपाच्या खड्ड्यावरील वाढीव दंड रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपवर कुरघोडी
मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. ...सविस्तर वाचा
धारावी पुनर्विकास प्रकल्प : १२ ऑगस्टनंतर घरोघरी जाऊन बायोमेट्रीक सर्वेक्षण बंद
डीआरपीच्या निर्णयानुसार १२ ऑगस्टनंतर घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार नाही. मात्र त्याचवेळी डीआरपी किंवा एनएमडीपीएलच्या कार्यालयात जाऊन रहिवाशांना कागदपत्रे जमा करून बायोमेट्रिक सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे. ...सविस्तर वाचा
मुख्यमंत्र्यांच्या शहरात मनसे आक्रमक, नासुप्रच्या अधिकाऱ्याला काळे फासले
मनसेने नासुप्रच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी सुरेश चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांना काळे फासून निषेध केला. ...वाचा सविस्तर
न्यायालयाच्या निकालासंदर्भात समाधानी, पुन्हा देशाची सेवा करता येईल याचा आनंद - ले. कर्नल प्रसाद पुरोहित
मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. ...सविस्तर वाचा
भाजपसोबतची युती सर्वात मोठी चूक; महायुतीतील सहभागी पक्षाचे नेते असे का म्हणाले?
भाजपसोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त करून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ...सविस्तर बातमी
मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहाराप्रकरण : महापालिका कंत्राटदारांच्या मुंबईतील आठ ठिकाणांवर ईडीचे छापे
बनावट सामंंजस्य करार सादर करणाऱ्या कंत्राटदारांवर छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...अधिक वाचा
महापालिकेच्या पाणी खात्यातील कामगारांचे प्रश्न प्रलंबित…'या' मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा
३१ ऑक्टोबरपर्यंत योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर १ नोव्हेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्यातील सर्व कामगार संपावर जातील, असा इशारा द म्युनिसिपल युनियनने दिला आहे. ...सविस्तर वाचा
शिवसेनेतून स्वगृही परतणाऱ्यांचे काँग्रेसमध्ये पुनर्वसन; लोकसभेला सेनेत गेलेल्या प्रदिप पाटील यांना पुन्हा शहराध्यक्ष पद
लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या अंबरनाथ शहर ब्लॉक अध्यक्ष प्रदिप पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. ...सविस्तर वाचा
कल्याण, डोंबिवलीतील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी कडोंमपाचा २४ तास टोल फ्री क्रमांक; आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून खड्डे पाहणी दौरा
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. ...सविस्तर बातमी
"न्यायालयाने शिक्कामोर्तब केल की, हिंदू कधीच आतंकवादी…" मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष सोडले असून या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ...सविस्तर वाचा
कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये मालमत्ता कर, पाणी देयक भरण्यासाठी नवीन अठरा केंद्रे; स्वामी नारायण सिटी, कासाबेला, पलावामध्ये नवीन केंद्रे
पालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्र स्तरावरील नागरी सुविधा केंद्र वगळून ही वाढीव नवीन भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ...सविस्तर बातमी
जोगेश्वरीमधील ट्रॉमा रुग्णालयातील ‘आयसीयू’ सेवा देणारी कंपनी काळ्या यादीत, २२ पैकी केवळ १० खाटा कार्यरत
एकूण २२ खाटांच्या दोन्ही अतिदक्षता विभागात सेवा पुरविण्याचे कंत्राट मॅक्स केअर हॉस्पिटल या कंपनीला देण्यात आले होते. मात्र या दोन्ही अतिदक्षता विभागांमध्ये सेवा पुरविण्यामध्ये कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा झाला. ...सविस्तर वाचा
Video: वाघाच्या पिंजऱ्यात तरुणाची उडी, ब्रिटिशकालीन प्राणीसंग्रहालयात…
प्राणीसंग्रहालय किंवा एखाद्या राष्ट्रीय उद्यानातील प्राणी बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणांवर अनेकदा लोक दगड मारतात किंवा ओरडतात. ...सविस्तर बातमी
स्वस्तात सोने सांगून आठ लाखांची हातोहात फसवणूक …
नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
...वाचा सविस्तर
नवी मुंबईतील पाणथळी वाचणार ….शासनाला उपरती, पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
नवी मुंबईतील विस्तीर्ण अशा पाणथळी निवासी तसेच वाणिज्य संकुलांसाठी खुल्या करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना शहरातील वाढता जनक्षोभ आणि पर्यावरण प्रेमींकडून सतत होणारा विरोध यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने अखेर वेसण घातली आहे.
...सविस्तर बातमी
डोंबिवलीत दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात खड्डे
डोंबिवली पश्चिमेतील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकातील रस्त्यावर आणि दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ...सविस्तर वाचा
डोंबिवलीत दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात खड्डे
डोंबिवली पश्चिमेतील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकातील रस्त्यावर आणि दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ...सविस्तर वाचा
स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..
फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. ...वाचा सविस्तर
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ३१ जुलै २०२५