रेल्वेमार्गावरील विविध अभियांत्रिकी कामांसाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान तीनही मार्गावरील काही सेवा रद्द राहणार असून रविवारी उपनगरीय वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू राहणार आहे.
- मध्य रेल्वे
कुठे – ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर
कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
परिणाम – ब्लॉकदरम्यान ठाण्यापुढे जाणाऱ्या सर्व धिम्या गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा ठाणे आणि डोंबिवली याच स्थानकांवर थांबतील. कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर जाण्यासाठी प्रवाशांना डोंबिवली वा कल्याणहून अप धिमी गाडी पकडावी लागेल. तसेच ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील.
- हार्बर मार्ग
कुठे – सीएसटी ते चुनाभट्टी व सीएसटी ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर
कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ३.४०
परिणाम – ब्लॉकदरम्यान सीएसटी-अंधेरी आणि सीएसटी-पनवेल यांदरम्यानच्या सेवा पूर्णपणे रद्द राहतील. मात्र पनवेल ते कुर्ला यांदरम्यान काही विशेष सेवा कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून चालवल्या जातील. हार्बर मार्गाच्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे किंवा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून वैध तिकिटासह प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- पश्चिम रेल्वे
कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
परिणाम – ब्लॉकदरम्यान सर्व धिम्या गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा या दोन स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.
***********************************************
पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठय़ाच्या वेळेत बदल
मुंबई : पश्चिम उपनगरातील एच पूर्व विभागात पाणीवितरणाच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पाणीपुरवठय़ाच्या वेळेत १२ जुलैपासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सेवानगर, जाकू क्लब, प्रभात वसाहत, टीपीएस ३ व टीपीएस ५, हनुमान टेकडी द्वार क्रमांक १ ते ५, मीलन सब वे ते खार सब वे, सांताक्रूझ पूर्व रेल्वेमार्गापासून पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंतचा परिसर या भागात पहाटे ४.४५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत होत असलेला पाणीपुरवठा मंगळवारपासून सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत केला जाईल.