मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते जाॅर्डन येथील क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान नवीन थेट विमानसेवा सुरू झाली आहे. ही नवीन सेवा आठवड्यातून चार वेळा असेल. त्यामुळे भारत आणि जाॅर्डनमधील प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होणार आहे.

जाॅर्डन येथे पेट्रा हे प्राचीन शहर, मृत समुद्र व इतर अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यामुळे भारतातून जाॅर्डनला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. जाॅर्डनमधील सर्वात मोठे विमानतळ असलेल्या क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई विमानतळाला जोडणारी थेट विमानसेवा सुरू झाल्याने, याचा भारतीय पर्यटकांना लाभ होणार आहे. मुंबईहून सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी जाॅर्डनला जाणारी विमानसेवा उपलब्ध असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईहून प्रवाशांना केवळ जॉर्डनशीच नव्हे तर मध्य पूर्व, युरोप, उत्तर आफ्रिका, अमेरिका आणि कॅनडामधील ५० हून अधिक ठिकाणी सुरळीत जोडले जाते. इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध असलेल्या जॉर्डनमध्ये विमानसेवेने थेट प्रवास करता येणार आहे. भारतीय पर्यटकांना जॉर्डनचे अद्वितीय आकर्षण दाखविण्याचे नियोजन आहे, असे रॉयल जॉर्डनियनचे मुख्य व्यावसायिक अधिकारी करीम मखलौफ यांनी सांगितले.