मुंबई : कोकणात अतिवृष्टीमुळे सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) आज सोमवार, १५ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : लवकरच नवीन राज्यपालांची नियुक्ती? बैस यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या आज सोमवार, १५ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.