मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाअंतर्गत मिठी नदीतील काही लाख लिटर पाण्याची गुणवत्ता वृद्धींगत करून ते पुन्हा नदीत सोडण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मिठी नदीत काही ठिकाणी मासे दिसू लागले आहेत, असाही दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.

महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईतच उगम पावणाऱ्या आणि मुंबईतच समुद्राला जाऊन मिळणाऱ्या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर इतकी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे. ही नदी माहिमच्या खाडीतून समुद्राला जाऊन मिळते.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी आलेल्या प्रलयंकारी पावसानंतर पूरस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची (एमआरडीपीए) १९ ऑगस्ट २००५ रोजी स्थापना करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) आणि सत्यशोधन समितीच्या शिफारसींनुसार दोन टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत व सेवा रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. एकेकाळी वाहती आणि समृद्ध नदी म्हणून ओळख असणारी मिठी कालांतराने घनकचरा, सांडपाणी, अतिक्रमण आदी समस्यांनी ग्रासली गेली आणि या नदीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सफेद पूल नाला, मरोळ बापट नाला आणि वाकोला नाला मिठी नदीला येऊन मिळतात. त्यामुळे ही नदी एका मोठय़ा नाल्याप्रमाणेच भासत होती.

‘मिठी नदी विकास आणि प्रदूषण नियंत्रण प्रकल्पा’अंतर्गत सध्या मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पवई भागात दररोज ८० लाख लिटर क्षमतेचा जल गुणवत्ता सुधारणा प्रकल्प जानेवारी २०२३ पासून अव्याहतपणे कार्यरत आहे. या प्रकल्पाद्वारे शुद्धीकरण केलेले पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मिठी नदीतील पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासह नदीतील जैवविविधता अबाधित राखण्यास व जैवविविधतेची वृद्धी होण्यास मदत होत आहे, असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.

अशी होते सांडपाण्यावर प्रक्रिया

  • मिठी नदीशी संलग्नित असलेल्या एका वाहिनीच्या ‘रोबोहोल’मधून हायड्रोलिक आणि गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पाणी प्रकल्प स्थळाकडे नेले जाते. यासाठी सुमारे ५९ ‘रोबोहोल’ (पूर्वीचा शब्द ‘मॅनहोल’) एकमेकांशी जोडले आहेत.
  •   प्रकल्पापर्यंत आणलेल्या पाण्यावर प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय अशा प्रक्रिया होतात. प्राथमिक प्रक्रियेत सांडपाण्यासोबत आलेला कचरा वेगळा केला जातो. द्वितीय प्रक्रियेत पाण्यातील धातू किंवा अन्य प्रकारचे सूक्ष्म कण वेगळे केले जाते. तृतीय प्रक्रियेत पाण्यातील दूषितपणा आणि दरुगधी दूर केली जाते. त्यानंतर अतिनील किरणांच्या मदतीने शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाते. शुद्ध झालेले पाणी पुन्हा मिठी नदीत सोडले जाते.
  • ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधारणा’ प्रकल्प पवई क्षेत्रात कार्यरत आहे. यामध्ये फिल्टरपाडाचा परिसर, मोरारजी नगर आणि मिठी नदीचा भाग येतो. या भागातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून या प्रकल्पामध्ये पाणी शुद्ध करून ते पुन्हा मिठी नदीमध्ये सोडले जाते.