ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. कुणी आम्हाला देशद्रोही म्हटलं तर त्याची जीभ हासडून टाकू, असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नारायण राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबई येथे विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये जीभ हासडण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “आहो, उद्धव ठाकरे कुणाचाही जीभ हासडण्याआधी स्वत:ची जीभ सांभाळा… असंच फिरत राहिलात तर ती जीभही जागेवर राहणार नाही. एकनाथ शिंदे यांनी डेरिंग करून दाखवली. ते ४० आमदारांना घेऊन गेले. जाताना ते उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ म्हणून गेले. यावर उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्यातली एकाची तरी जीभ किंवा नाक का नाही पकडलं? हात का नाही पकडला? ४० लोक निघून गेले पण उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवलं का? ते कसलं बोलतात, तो शब्द त्यांना शोभत नाही.”

हेही वाचा- मोठी बातमी: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

नेमकं प्रकरण काय?

खरं तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षाला चहापानाचं आमंत्रण दिलं होतं. पण चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका केली. ‘बरं झालं, देशद्रोह्यांबरोबर चहापान टळला’ असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

हेही वाचा- ठाकरे गटाचे उरलेले १५ आमदारही शिंदे गटात जाणार?; नारायण राणेंचं सूचक विधान, म्हणाले…

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

खेडमधील सभेतून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane criticise uddhav thackeray statement about pulling tongue mumbai rmm
First published on: 08-03-2023 at 20:25 IST