शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर सनसनाटी आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रिया चक्रवर्तीला ‘AU’संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘AU’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती लोकसभेत देत राहुल शेवाळेंनी चौकशीची मागणी केली होती.

राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपानंतर भाजपा आमदार नितेश राणेही आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक झाले. “सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियनचा विषय येतो, तेव्हा आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतो. अन्य कुणाचा का होत नाही. कुठे ना कुठे दाल मै काला है. त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. जसं श्रद्धा वालकर प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट करण्यात आल्यावर सर्व समोर आलं. A फॉर अफताब आणि A फॉर आदित्य. सगळ्या विकृतीचं नाव एकसमान झालं आहे,” अशी टीका नितेश राणेंनी केली होती.

हेही वाचा : “आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था”, व्हिडीओ ट्वीट करत मिटकरींचे भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितेश राणेंच्या टीकेला शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “नितेश राणे आणि निलेश राणे यांची पहिल्यांदा नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच, नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. कधी काँग्रेस, कधी भाजपा, कधी शिवसेनेला शिव्या घातल्या तुम्ही. याविषयावर बोलायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” असे टीकास्त्र संजना घाडी यांनी सोडलं आहे.