मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने पुणे येथील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बुधवारी पहाटे अटक के ली. विशेष न्यायालयाने गिरीश यांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी खडसे यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जानेवारीत ईडीने खडसे यांच्याकडे चौकशी केली होती.

ईडीने मंगळवारी गिरीश यांना चौकशीसाठी बोलावले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर बुधवारी पहाटे त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. गिरीश चौकशीस सहकार्य करत नाहीत, प्रकरणाशी संबंधित माहिती ते दडवत आहेत, अशी माहिती ईडीने न्यायालयाला दिली.

ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रोर के ली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीआधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या घडमोडीचा आधार घेत ईडीने समांतर तपास सुरू के ला. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला. डिसेंबर महिन्यात ईडीने खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोप काय? – या व्यवहारासाठी खडसे यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर के ला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना खरेदी व्यवहाराच्या नोंदीनुसार गिरीश यांनी तो ३.७५ कोटी रुपयांना विकत घेतल्याची नोंद आढळते. हा भूखंड इतक्या कमी कि मतीस कसा विकत घेतला आणि तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या रकमेचा स्रोत काय, या मुद्दय़ांवर ईडीने तपास सुरू के ला. गिरीश यांनी चौकशीदरम्यान काही कं पन्यांकडून कर्ज घेतले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ही रक्कम बोगस कं पन्यांद्वारे वळविण्यात आल्याची माहिती तपासातून हाती आल्याचे ईडीने सांगितले.