मुंबई : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोराजवळ बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात किमान १३ जणांना प्राण गमवावे लागले आणि १० जण जखमी झाले. आग लागल्याच्या अफवेमुळे लखनऊ – मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारली आणि लगतच्या रेल्वे मार्गावरून वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी चार जण नेपाळमधील नागरिक होते. तसेच १३ मृतांपैकी सहा जणांची ओळख पटली असून उर्वरित सहा जणांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुळचे नेपाळमधील रहिवासी कमला भंडारी (४३), लच्छीराम खटारू पासी (४०), हिम्मू विश्वकर्मा (११), जवकला भाटे (६०) मूळचे उत्तर प्रदेशमधील इम्तियाज अली (३५), नसिरुद्दीन बद्रुद्दीन अन्सारी (१९), बाबू खान (२७) यांचा मृत्यू झाला. जखमी नऊ प्रवाशांची ओळख पटली असून त्यांची नावे हसन अली, विजय कुमार, उत्तम हरजन, धर्मा सावंत, अबू मोहम्मद, मोहरा, हकीम अन्सारी, दीपक थापा आणि हुजाला सावंत अशी आहेत.

हेही वाचा – संक्रमण शिबिरार्थींच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला आठवड्याभरात सुरुवात

पाचोरा येथील वृंदावन रुग्णालय आणि विघ्नहर्ता रुग्णालयात हसन अली, विजय कुमार, उत्तम हरजन, धर्मा सावंत आणि अबू मोहम्मद यांच्यासह पाच गंभीर जखमी प्रवाशांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली. याशिवाय मोहरम, हकीम अन्सारी, दीपक थापा आणि हुजाला सावंत यांच्यासह चार जखमी प्रवाशांना ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

हेही वाचा – सिद्धार्थ रुग्णालयातील आरोग्य सुविधा जानेवारी २०२६ पर्यंत सुरू करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी त्यांच्या पथकासह दोन्ही रुग्णालयांना भेट दिली आणि नऊ जखमी प्रवाशांना मदतीपोटी एकूण २ लाख ७० हजार रुपयांचे वाटप केले. शिवाय, मृतांच्या कुटुंबातील सदस्याला / कायदेशीर वारसांना १.५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.