महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेची निवडणूक नुकतीच पंढरपूर येथे झाली. यामध्ये हरिश्चंद्र पवार (मुंबई) यांची निवड झाली. याशिवाय कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यामध्ये कार्याध्यक्षपदी सुनिल पाटणकर (वर्धा), सरचिटणीसपदी बालाजी पवार (नांदेड) आणि कोषाध्यक्षपदी गोरख भिलार (पंढरपूर) यांची निवड झाली.
राज्य व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून गोपीनाथ चव्हाण (उरण), श्रीकृष्ण शिंदे (बुलढाणा), शिरीश जैन (धुळे) यांची निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी नरहरी आवटी (मुंबई), दिनेश उके (गोंदिया), अण्णासाहेब जगताप (औरंगाबाद), विकास सूर्यवंशी (सांगली), श्रीराम खत्री (यवतमाळ), गोपाल चौधरी (जळगाव), ज्ञानेश्वर धुमाळ (कसारा) यांची निवड करण्यात आली.
विभागीय संघटन सचिव पदावर संजय पावसे (मुंबई), विनोद पन्नासे (चंद्रपूर), शिवाजी खेडकर (परभणी), रघुनाथ कांबळे (कोल्हापूर), मनोज खांबे (महाड), ललित अग्रवाल (अकोला), रविंद्र कुलकर्णी (मालेगाव) यांची नियुक्ती झाली.
सल्लागार सदस्य म्हणून अशोक डहाके (जळगाव), शिवगौडा खोत (इचलकरंजी), तर राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून भाऊ राणे, सदा नंदूर (मुंबई), जमीर शेख (आंजी), बिंदुसार गणविर, राकेश आकरे (नागपूर), मेघराज टोणपे (चंद्रपूर), संजीव धोटे (तुमसर), किशोर मोरे (भंडारा), संजिव दोनोडे (आमगाव), चेतन चौधरी (नांदेड), भीमराव वायभट (औरंगाबाद), किसन क्षीरसागर (लातूर), जगदीश उंबरदंड (लातूर), पांडुरंग माळी, उमेश वानी (नंदूरबार), विकास सूर्यवंशी (धुळे), रवी जोशी (जळगाव), प्रकाश उन्हाळे (शेगाव), आनंद धोडवड, राजेंद्र माळी (सातारा), प्रकाश गुंड (परभणी), संतोष शीरभाते (यवतमाळ), पांडुरंग हरमकर (अकोला), मारोती नवलाई (सांगली), सुदाम चव्हाण, परमेश्वर खरात (बीड), विकास पवार (पंढरपूर), अण्णा गुंडे (रामोळी), यांची निवड करण्यात आली आहे.
विविध ठिकाणच्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली असून त्यांचे प्रश्न निकाली काढून शासनाकडील बुकस्टॉल व कल्याणकारी मंडळाच्या मागणीचा पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे राज्य अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी स्पष्ट केले.