दोन दिवसांपूर्वी बेस्ट बसमध्ये एका महिलेला दुखापत झाली असता बसमधील प्रथमोपचार पेटीत औषधे नसल्याचे वाहकाने सांगितले होते. याबाबत बेस्टने ही प्रथमोपचार पेटी बसगाडय़ांमध्ये अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. बसगाडय़ांमध्ये ही प्रथमोपचार पेटी आवश्यक असते मात्र एमआरटीपी कायद्याअंतर्गत बेस्टला यातून वगळण्यात आल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगितले. मात्र बेस्ट बसगाडीत एखाद्या प्रवाशाला ईजा झाल्यास वाहकाने गाडी तातडीने जवळच्या खासगी अथवा सरकारी रुग्णालयात नेणे अपेक्षित आहे. तशा सूचनाही वाहकांना देण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2015 रोजी प्रकाशित
बेस्टला प्रथमोपचार पेटी अनिवार्य नाही
दोन दिवसांपूर्वी बेस्ट बसमध्ये एका महिलेला दुखापत झाली असता बसमधील प्रथमोपचार पेटीत औषधे नसल्याचे वाहकाने सांगितले होते.

First published on: 18-04-2015 at 04:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No first aid box mandatory to best bus