मुंबई : सप्टेंबर महिन्यात मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात विनापरवागनी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह ६ आयोजकांना सोमवार १० नोव्हेंबर आझाद मैदान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. आयोजकांविरोधात सप्टेंबर महिन्यात विनापरवनगी आंदोलन करून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले होते. आझाद मैदानात जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते यावेळी हजारो कार्यकर्ते मुंबईत जमा झाले होते. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तसेच परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. घोषणाबाजी करत रस्ते अडवून वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांविरोधात ३ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदानात कलम १८९ (२), १८९(३), १९०, २२३ (१), २२३ (२), १२६(२) २७१ आणि २७१ अन्वये तसचे महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कल म ३७(३), ३८, १३५, १३६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
६ जणांना नोटीस
या गु्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह ६ प्रमुख आयोजकांना आझाद मैदान पोलिसांनी समन्स बजावले आहे. सोमवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजत आझाद मैदानात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील, (अंतरवाली सराटी, जालना) सिताराम कलकुठ्ठे, (बीड) विरेंद्र पवार, मराठी आरक्षण आंदोलन समनव्य, (दादर) पांडुरंग तारक (जालना) प्रशांत सावंत (मुंबई) चंद्रकांत भोसले (मुंबई) आंदीचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) ज्ञानेश्वर आव्हाड यांनी कलम ३५ (३) अन्वये ही नोटीस कढली आहे.
