मुंबई : सीएसएमटी – मडगाव जंक्शनदरम्यान एक दिवसीय विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होईल.

नियमित आणि सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी क्रमांक ०११७१ सीएसएमटी – मडगाव जंक्शन विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी १४ जून रोजी सकाळी ७.३५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२.३० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी स्थानकांवर थांबा असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रेल्वेगाडीला एकूण १६ एलएचबी डबे असणार आहेत. यात द्वितीय आसनी १० डबे, चेअर कार ३ डबे, विस्टाडोमचा एक डबा, एसएलआर एक आणि जनरेटर प्रत्येकी एक डबा असेल, अशी माहिती कोकण रेल्वेती सूत्रांनी दिली.