पत्राचाळ पुनर्विकास घोटाळय़ाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने काल (बुधवार) जामीन मंजूर केला. तर दुसरीकडे संजय राऊत यांना जामीन देण्याच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानेही नकार दिल्याने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दुहेरी तडाखा मिळाला. यामुळे कालपासून शिवसेनेत(ठाकरे गट) जल्लोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांनीही पत्रकारपरिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या तसेच संजय राऊत यांनीही भावना व्यक्त करत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी तुरुंगातील दिवसांच्या अनुभवाबाबतही सांगितले.

हेही वाचा – पक्षासाठी दहावेळा तुरुंगात जाण्यास तयार; पाठीत खंजीर खुपसणे आमच्या रक्तात नाही – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “एकांतवास खडतर असतो, मी तुरुंगात हाच विचार करत होतो की, दहा-बारा वर्षे सावरकर कसे राहिले, लोकामान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात कसे राहिले? किंवा आणीबाणीच्या काळात इतर बंदी कसे राहिले?, वर्षानुवर्षे लोक राहत असतात. मी १०० दिवस राहिलो, पण तिथे एकएक तास हा १०० दिवसांसारखा असतो. अशाही परिस्थिती या देशातील राजकीय कैद्याना रहावं लागतं. मी स्वत:ला युद्ध कैदी मानत होतो.”

Sanjay Raut Bail Granted : ईडीचा बेकायदेशीर कारभार, तोंडावर आपटले जोरदार – नाना पटोलेंचा टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय “तुरुंगातील दिवसांवर पुस्तक तयार झालेलं आहे, नक्कीच हे अनुभव लोकांपर्यंत पोहचवायचे असतात. दोन पुस्तकं मी तुरुंगात तयार केली. वेळेचा सदुपयोग व्हायला पाहिजे,मी लिहिणारा माणूस आहे. एकतर मी तुरुंगात सतत वाचण्याचा प्रयत्न करत होतो. जेजे मी वाचलं, पुस्तकाती किंवा वर्तमानपत्रामधील मला आवडल्या आणि ते लोकांपर्यंत सुद्धा गेलं पाहिजे, हल्ली लोकांचं वाचन कमी झालं आहे. तेवढ्या गोष्टी मी माझ्या डायरीत लिहिल्या आहेत आणि त्याचं पुस्तक करावं असं मला वाटतं, जे लोकांपर्यंत पोहचावं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या हल्लीची मुलं, तरूण वाचत नाहीत. ज्या माझ्या वाचनात आल्या आहेत. इतिहासासंदर्भातील काही नवीन माहिती आहे, काही राजकीय माहिती असेल, अन्य घडामोडी असतील.” असं संजय राऊत म्हणाले.

तुरुंगातील जीवन हे एकांतवासातलं जगणं असतं –

याचबरोबर, “तुरुंगातील जीवन हे एकांतवासातलं जगणं असतं. त्याला तुरुंग म्हणतात, तिथे फक्त भिंती दिसतात, उंच भिंती. तुम्हाला फक्त भिंत दिसते. तुम्हाला माणूस दिसत नाही. तुम्ही तुरुंगात जाल तेव्हा तुम्हाला कळेल, माझ्या शुभेच्छा आहेत तुम्ही जाऊ नये.” असंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.