मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल – गांधीनगरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा गुजरातमधील एका रेल्वे स्थानकातील थांबा वाढविण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर वलसाड येथे अतिरिक्त थांबा दिला आहे.

देशातील तिसऱ्या क्रमांकाची आणि पश्चिम रेल्वेवरील पहिली मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस धावली. अत्यंत कमी कालावधीत वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर, मुंबई सेंट्रलहून २८ जुलै रोजी सुटणारी गाडी क्रमांक २०९०१ मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस वलसाड रेल्वे स्थानकात थांबेल. ही रेल्वेगाडी सकाळी ८.१९ वाजता वलसाड रेल्वे स्थानकात पोहोचेल आणि सकाळी ८.२१ वाजता निघेल. यामुळे या रेल्वेगाडीला सुरत, वडोदरा, आणंद आणि अहमदाबाद स्थानकात पोहोचण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याआधी मार्च २०२५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर आणंद रेल्वे स्थानकातील थांबा वाढविला होता.

वलसाड येथे २७ जुलैपासून थांबा

गांधीनगर येथून २७ जुलै रोजी सुटणारी गाडी क्रमांक २०९०२ गांधीनगर – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस वलसाड स्थानकावर थांबेल. ही रेल्वेगाडी वलसाड स्थानकात सायंकाळी ५.५१ वाजता पोहोचेल आणि सायंकाळी ५.५३ वाजता निघेल. यामुळे गाडी क्रमांक २०९०२ गांधीनगर येथून दुपारी २.०५ ऐवजी २:०० वाजता निघेल. त्याचप्रमाणे, ही गाडी अहमदाबाद, आणंद, वडोदरा आणि सूरत स्थानकांत पोहोचण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

असे असेल वेळापत्रक

गाडी क्रमांक २०९०१ मुंबई सेंट्रल – गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून सकाळी ६ वाजता सुटेल. त्यानंतर बोरिवली येथे सकाळी ६.२३ वाजता पोहचून, सकाळी ६.२५ वाजता सुटेल. वापी येथे सकाळी ७.५६ वाजता पोहचून आणि सकाळी ७.५८ वाजता सुटेल. वलसाड येथे सकाळी ८.१९ वाजता पोहचून, सकाळी ८.२१ वाजता सुटेल. सूरत येथे सकाळी ९ वाजता पोहचून, सकाळी ९.०३ वाजता सुटेल. वडोदरा येथे सकाळी १०.१८ वाजता पोहचून, सकाळी १०.२१ वाजता सुटेल. आणंद येथे सकाळी १०.४३ वाजता पोहचून, सकाळी १०.४५ वाजता सुटेल. अहमदाबाद येथे सकाळी ११.३० वाजता पोहचून, सकाळी ११.३५ वाजता सुटेल. तर, गांधीनगर येथे दुपारी १२.२५ वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक २०९०२ गांधीनगर वंदे – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस गांधीनगर येथून दुपारी २ वाजता सुटेल. अहमदाबाद येथे दुपारी २.४० वाजता पोहचून, दुपारी २.५० वाजता सुटेल. आणंद येथे दुपारी ३.२५ वाजता पोहचून, दुपारी ३.२७ वाजता सुटेल. वडोदरा येथे दुपारी ३.४८ वाजता पोहचून, दुपारी ३.५१ वाजता सुटेल. सूरत येथे सायंकाळी ५.०५ वाजता पोहचून, सायंकाळी ५.०८ वाजता सुटेल. वलसाड येथे सायंकाळी ५.५१ वाजता पोहचून, सायंकाळी ५.५३ वाजता सुटेल. वापी येथे सायंकाळी ६.१३ वाजता पोहचून, सायंकाळी ६.१५ वाजता सुटेल. बोरिवली येथे सायंकाळी ७.३२ वाजता पोहचून, सायंकाळी ७.३४ वाजता सुटेल. तर, मुंबई सेंट्रल येथे रात्री ८.३० वाजता पोहचेल.