मुंबई : राज्यातील शाळांना गुणवत्ता पूर्ण शिक्षक मिळावेत, यासाठी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जात आहे. तरीही पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास पुढील भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्रुटी दूर केल्या जातील, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.

पवित्र पोर्टलची तरतूद महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या अटी) विनियमन (एमईपीएस) कायद्यात आहे, त्याला वैधानिक स्वरुप प्राप्त झाले आहे. शाळांमधील शंभर टक्के भरती बाबत वित्त विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. वित्त विभागाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत म्हणून पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येते.

तरीही पवित्र पोर्टलमध्ये काही त्रुटी असतील तर पुढील भरती प्रक्रियेपूर्वी दुरुस्ती करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काही करता येईल, ते सर्व करू, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. शिवसेनेचे जग्गनाथ अभ्यंकर यांनी हा विषय उपस्थित केला होता.

पवित्र पोर्टलद्वारे भरती का?

पवित्र पोर्टल (Pavitra Portal) हे महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यासाठी शासनाने सुरू केलेले ऑनलाइन पोर्टल आहे. या पोर्टलद्वारे, राज्यातील शासकीय, निम-शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती केली जाते. यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, तसेच त्यांच्या पसंतीक्रमानुसार शाळांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करता येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता आणणे आणि गैरप्रकार टाळणे. भरती प्रक्रिया जलद आणि सुलभ करणे. पात्र आणि गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड करणे आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा होण्याच्या उद्देशाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येते.