मुंबई : पंजाब व महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेले ‘एचडीआयएल’चे राकेश वाधवान यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला.

वाधवान यांनी वैद्यकीय कारणास्तव तातडीने जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती. परंतु वाधवान यांची मागणी समर्थनीय नसल्याचे नमूद करत न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी त्यांची याचिका फेटाळली. वाधवान यांना शासकीय रुग्णालयात योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. शिवाय त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासते. त्या वेळी त्यांना ते उपचार दिले जातात. ही बाब लक्षात घेता वैद्यकीय कारणास्तव वाधवान यांचा जामीन फेटाळल्याने त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र आपत्कालीन वैद्यकीय स्थिती उद्भवल्यास ते अंतरिम जामिनासाठी याचिका करू शकतात, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट के ले. वाधवान यांच्यावर नुकतीच जेजे रुग्णालयात पेसमेकर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. केईएम रुग्णालयांतील डॉक्टरांच्या शिफारशीनंतर वाधवान यांच्यावर जेजे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.