मुंबई : पोलीस वाहनावर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटका आल्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मुलुंड येथे घडली. रामा महाले (वय ४८) असे या पोलीस शिपायाचे नाव असून, ते मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

हेही वाचा – “अध्यक्षांना धमकी देणं खपवून घेणार नाही”, फडणवीसांच्या आरोपावर भास्कर जाधव म्हणाले, “नाना पाटेकरांनी…”

हेही वाचा – ‘शिंदे गटाचे घोटाळे भाजपाच उघड करतंय’; आदित्य ठाकरेंच्या विधानावर संदिपान भुमरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुलुंड पोलीस ठाण्यातील मोबाईल क्रमांक १ या पोलीस वाहनावर ते चालक म्हणून काम करत होते. रविवारी मुलुंड परिसरात गस्त घालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना परिसरातील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलुंड पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे.