लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: मुंबई पोलिसांनी बोरिवली येथील स्पा सेंटरवर छापा टाकून देहव्यापारातून पाच महिलांची सुटका केली. पोलिसांनी स्पा सेंटरच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस मालकाचा शोध घेत आहेत.

बोरिवली (पश्चिम) येथील आयसी कॉलनीमधील ‘झेन लक्झरी स्पा’मध्ये देहव्यापार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती एमएचबी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे तोतया ग्राहक पाठवला आणि माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी स्पा सेंटरवर छापा टाकून देहव्यापारातून पाच महिलांची सुटका केली. पोलिसांना या सेंटरमध्ये काही मोबाइल, रोख रक्कम आणि इतर साहित्य सापडले. स्पा सेंटरमधून सुटका करण्यात आलेल्या पाच महिलांना पोयसर येथील रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आले.

हेही वाचा… समीर वानखेडेंचे मुंबईत चार फ्लॅट्स, पाच वर्षांत सहा परदेश दौरे; अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी स्पा सेंटरचा संचालक गौतम पारकर, इब्राहिम शेख आणि रोखपाल हानाव नौनाई यांच्याविरुद्ध अनैतिक तस्करी (प्रतिबंध) कायदा आणि मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.