मुंबई : मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी ११ बॉम्ब ठेवले असून मागण्या मंजूर न झाल्यास त्यातील तीन ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल रिझर्व बँकेला प्राप्त झाला. ईमेलमध्ये फोर्टमधील आरबीआय नवीन केंद्रीय कार्यालय इमारत, चर्चगेट येथील एचडीएफसी हाऊस आणि वांद्रे-कुर्ला संकूल येथील आयसीआयसीआय बँक टॉवर्स येथे तीन बाॅम्बचा बरोबर दीड वाजता स्फोट होईल, असे धमकावण्यात आले होते. या धमकीच्या ईमेलमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ईमेलनंतर संबंधीत ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ३७ नवे रुग्ण

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत (आरबीआय) खाजगी क्षेत्रातील बँकांनी मिळून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. त्यात अनेक मोठे व्यक्ती व अधिकारी सामील आहेत. आरबीआय गव्हर्नर आणि वित्त मंत्री या दोघांनाही मागणी करतो की, त्यांनी त्यांच्या पदांचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि एक परिपत्रक जारी करत घोटाळ्याच्या संपूर्ण खुलासा करावा. त्या दोघांना आणि या घोटाळ्याशी अन्य संबंधितांना शिक्षा द्यावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो. जर आमची मागणी दुपारी दिड वाजण्याच्या आधी पूर्ण झाली नाही तर, सर्व ११ बॉम्ब एकाने फोडले जातील, अशी धमकी देणारा ईमेल मंगळवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी आरबीआयच्या मुंबईतील कार्यालयातील अधिकृत ईमेल आयडीवर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> Bomb Threat Emails to RBI: आरबीआयसह मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, ईमेल आल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

खिलापत इंडिया नावाच्या ईमेल आयडीवरुन आलेल्या धमकीच्या या इमेलनंतर मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढविण्यात आली असून सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. आरबीआयकडून या इमेलची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी बाॅम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके आणि पोलिसांचा फाैजफाटा आरबीआयच्या कार्यालयासह इमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या ठिकाणी रवाना करुन तपासणी केली आहे. मात्र संशयास्पद काहीच आढळले नाही. परंतू, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आरबीआयचे मुख्य सुरक्षा अधिकारी संजय पवार यांच्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात खिलापत इंडीया जीमेल डॉट कॉमच्या वापरकर्त्या आरोपीविरोधात भादंवि कलम ५०५ (१)(ब), ५०५(२), ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.