Porn apps Case : राज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

porn apps case, Raj Kundra arrested : अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली कुंद्रासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Raj Kundra, Raj Kundra porn app case, Raj Kundra pornography case, Raj Kundra, Ryan Tharp arrest
अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रासह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (छायाचित्र।प्रदीप दास)

फेब्रुवारीत उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री मोठी कारवाई केली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रासह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील काही जामीनावर सुटले आहेत.

हेही वाचा- “पैसै कसे कमवता?”; ‘द कपिल शर्मा शो’मधील राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पॉर्न फिल्म्स निर्मिती रॅकेट प्रकरणात पोलिसांनी सोमवारी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पॉर्न फिल्म्स निर्मितीत राज कुंद्रा मुख्य सुत्रधार असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे म्हटलं होतं. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. रायन जॉन थार्प असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

हेही वाचा- राज कुंद्रा गुन्हेगारी प्रकरणांची यादी : इक्बाल मिर्ची, बिटकॉईन घोटाळा, IPL सट्टेबाजी ते Porn App प्रकरण…

रायन थार्प विरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायन थार्पचे थेट राज कुंद्रा याच्यासोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. रायनही पॉर्न चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी होता. दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Porn apps case pornographic films mumbai police raj kundra ryan tharp arrested in porn apps case bmh

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी