मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १०/११ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त २३ मे ते ३१ मेपर्यंत दररोज रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मुंबई-पुणे प्रगती, इंटरसिटी आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत या रेल्वेगाड्या रद्द असणार आहेत. तर, लोकल सेवेचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.

ब्लॉक कालावधीत भायखळा ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून डाऊन धीम्या मार्गावरील रात्री १२.१४ ची कसारा लोकल शेवटची असणार आहे. ब्लॉकनंतरची पहिली सीएसएमटी-कर्जत लोकल पहाटे ४.४७ वाजता सुटेल. रात्री ९.४३ ची कर्जत-सीएसएमटी, रात्री १०.३४ कल्याण-सीएसएमटी शेवटची लोकल असेल.

Solapur, pregnant woman, train journey, Konark Express, labor pains, railway station, delivery, railway police, RPF, solapur news,
सोलापूर : रेल्वेतून प्रवासात प्रसव वेदना वाढल्या अन् झाली सुखरूप प्रसूती
Kalyan, signal malfunction, Central Railway, service disruption, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Kasara, Karjat, local trains, commuter chaos, railway stations, passengers, Dombivli, rain, road traffic, transportation, thane news, marathi news, kalyan news, Central railway news, loksatta news,
कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त
Special trains, Konkan, Ganesh utsav,
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या, २१ जुलैपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार
Konkan Railway Services Disrupted, Pedne Malpe Tunnel Floods, Trains Cancelled and Rerouted on konkan railway, konan railway, heavy rain in konkan railway affected, marathi news,
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात पुन्हा पाणी भरले; चार रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले
haji ali Mumbai , haji ali to worli sea link marathi news
सागरी किनारा मार्गावरील हाजी अली – वरळी टप्पा लवकरच सुरू होणार, वांद्रे – वरळी सागरी सेतूसाठी अद्याप प्रतीक्षा
Mumbai vande bharat express marathi news
मुंबई: जोरदार पावसाने वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले
Mumbai-Goa highway is currently in a major state of disrepair in the Wadkhal to Indapur stretch near Lonere
विश्लेषण : पहिल्या पावसातच चाळण… मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दैवाचे दशावतार कधी संपणार?
Mumbai Weekend Railway Block, Railway Blocks on Western and Central Lines, Railway Block on Western Line, Railway Block on Central Line, Railway Block on harbour Line, Maintenance Work,
शनिवारी पश्चिम आणि रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक

हेही वाचा – ना.म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास : म्हाडाने काढलेली घरांची सोडत रहिवाशांना अमान्य, भेदभाव झाल्याचा आरोप, न्यायालयात धाव

दादर स्थानकापर्यंत येणाऱ्या रेल्वेगाड्या

लखनऊ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्स्प्रेस, होसपेट जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या

सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस

पनवेल स्थानकात रद्द आणि रवाना..

सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येईल. तर अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत चालवण्यात येईल.

हेही वाचा – ४ जून रोजी निकालानंतर मद्यविक्रीस परवानगी द्या, मागणीसाठी आहार उच्च न्यायालयात

या रेल्वेगाड्या रद्द

सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ३१ मेपर्यंत रद्द)

पुणे- सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ३१ मेपर्यंत रद्द)

पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (३१ मे रोजी)

नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (३१ मे रोजी)

साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (३१ मे)