“किरीट सोमय्या यांच्याबाबत राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध आहे. अशाप्रकारे मुस्कटदाबी सरकार करू शकत नाही. तसेच, कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही. अशाप्रकारच्या कारवाईमुळे सत्य लपवता येणार नाही.” अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली असून, ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर म्हणाले की, “किरीट सोमय्या यांच्या संदर्भात जी कारवाई राज्य शासन करत आहे. ती अत्यंत अयोग्य आहे, त्याचा मी निषेध करतो. किरीट सोमय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा कथित घोटाळा उघड करण्यासंदर्भात कागदपत्र जमवणं, अशासाठी त्या ठिकाणी कोल्हापुरला जाणार होते. परंतु, १४४ कलम लावून त्यांना येण्यासाठी अटकाव करण्यात आला. खरंम्हणजे ते देवदर्श करून कोल्हापूरला जाणा होते. परंतु, अशाप्रकारची मुस्काटदाबी सरकारने करायला नव्हती पाहिजे. दुर्दैवाने सरकारचे आज ३०-४० पोलीस मुलुंड या ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर आहेत, त्यांना ताब्यात ठेवत आहेत. लोकाशाहीला शोभा देणारी अशी ही कारवाई नाही, त्यामुळे या कारवाईचा आम्ही निषेध करतो. कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या कारवाईमुळे सत्य लपवता येणार नाही. किरीट सोमय्या यांना जे काही करायचं आहे, ते निश्चितपणे ते करतच राहातील. त्यामुळे अशाप्रकारचं दबावाचं राजकारण सरकार जे करत आहे, ते लोकशाहीला मारक आहे. लोकशाहीला विसंगत आहे.”

किरीट सोमय्यांवरील स्थानबद्धतेच्या कारवाईवर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कारवाईवर प्रतिक्रिया दिलेली आहे. “माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?”; चंद्रकांत पाटील यांचा सवाल!

याचबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील या मुद्य्यावरून महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल. महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजपा घाबरणार नाही. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे.” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा; कोल्हापूर जिल्ह्यात न येण्याचे आदेश

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin darekar criticizes the state government for taking action against kirit somaiya msr
First published on: 19-09-2021 at 19:38 IST