मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान व्यक्त करावे अशी स्थिती नाही. मुंबई महानगरपालिकेने किती गाळ काढला हे सांगण्यापेक्षा नाल्यात किती खोल सफाई झाली, त्या खोलीची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार यांनी मंगळवारी तिसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर, मनिषा चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, श्रीकला पिल्लई, संदीप पटेल, कमलेश यादव, प्रियांका मोरे, प्रतिभा गिरकर, लिना देहरकर, शेजल देसाई, अंजली खेडकर, प्रवीण शहा, जगदिश ओझा, जितेंद्र पटेल, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा – मुंबई : पार्किंगच्या वादात एअर गनने धमाकावले

या पाहणी दौऱ्यात प्रथम ओशिवरा नदी आणि भगतसिंग नाल्यातील सफाईच्या कामाचा आढावा घेण्यात आला. दोन्ही ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू होते. समुद्राला भरती असल्याने पाणी भरलेले असले तरी जेसीबीच्या सहाय्याने खालून गाळ काढला जात होता. वळनाई नाल्यात गाळाचे ढिग कायम असून दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.

हेही वाचा – बदलापूर रेल्वे स्थानकाचा परिसर कात टाकणार; ‘सॅटिस’ प्रकल्पाअंतर्गत ५०० मीटर परिसराचा विकास होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भीमनगर नाल्याची सफाई करण्यात आली आहे. मात्र नाल्याच्या काठावर अनधिकृत बांधकामे असून त्यामुळे या नाल्याची रुंदी कमी झाली आहे. तर दहिसर नदीच्या सफाईचे काम अद्याप सुरू असून बराच गाळ नदीत शिल्लक आहे. याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, महानगरपालिकेने गाळाच्या वजनाची जशी आकडेवारी जाहीर केली, तशी किती खोल गाळ काढला याचीही आकडेवारी जाहीर करावी. तरच किती सफाई झाली हे कळेल. अन्यथा तरंगता गाळ काढून सफाई झाल्याचे चित्र कंत्राटदार उभे करतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.