लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एड्स, एचआयव्हीबाबत नागरिकांमध्ये अद्यापही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे त्याबाबत जनजागृती, वैद्यकीय तपासणी, उपचार आदीची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने एक विशेष क्यूआर कोड तयार केला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करताच नागरिकांना एड्ससंदर्भातील सर्व माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.

एचआयव्ही, एड्सबाबतचा संपूर्ण तपशिल, वैद्यकीय तपासणी, उपचार आदींबाबतची माहिती नागरिकांना सहज उपलब्‍ध व्हावी, त्यांच्या मनातील आजाराबाबतचे गैरसमजही दूर व्हावे या अनुषंगाने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने ‘एमडॅक्स एचआयव्ही केअर’ हे क्यूआर कोड तयार केले आहे. मुबई महानगरपालिकेचे उपायुक्‍त तथा मुंबई जिल्‍हा एड्स नियंत्रण संस्‍थेचे प्रकल्‍प संचालक रमाकांत बिरादार यांच्या हस्ते या क्यूआर कोडचे सोमवारी अनावरण करण्यात आले. हा क्‍यू आर कोड स्‍कॅन केल्‍यावर नागरिकांना एड्ससंदर्भातील सर्व माहिती मोबालवर सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील शंका दूर होण्यास मदत होईल.

आणखी वाचा-मुंबई: सल्ला शुल्क ८५ कोटी रुपयांवर; सल्लागाराच्या शुल्कात पाचव्यांदा सात कोटी रुपयांची वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविद्यालयीन तरुणांना बनविणार युवा दूत

समाजामध्‍ये एचआयव्‍ही, एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयातील युवकांना ‘युवा दूत’ बनविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण मुंबईमध्ये महाविद्यालयीन युवकांकरीता व शालेय विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई जिल्‍हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत युवकांमध्ये एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य, रिल मेकींग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांकरीता एचआयव्ही / एड्स या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा भरवण्याचे नियोजन आहे.