मुंबई : प्रवाशांना मौल्यवान सामान सुरक्षित ठेवता यावे यासाठी मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांमध्ये डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम (डिजी लॉकर्स) सुविधा उपलब्ध करण्यात आली असून प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन डिजी लॉकर्सच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी आणि दादर स्थानकांमध्ये एकूण ५६० डिजी लॉकर्स उपलब्ध आहेत.

हेही वाचा >>> सेंट जॉर्ज रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग येत्या गुरुवारपासून सुरू होणार

भारतीय रेल्वेमधील पहिली डिजी लॉकर यंत्रणा मध्य रेल्वेवरील जागतिक वारसा लाभलेल्या सीएसएमटीवर उभारण्यात आली. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या किंवा मुंबईतून जाणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना बॅग, मौल्यवान वस्तू ठेवण्यास सुरक्षित जागा मिळाली. त्यानंतर दादर आणि एलटीटी येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. सध्या सीएसएमटी, दादर आणि एलटीटी येथे अनुक्रमे ३००, १६०, १०० असे एकूण ५६० डिजी लॉकर्स आहेत.

हेही वाचा >>> सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प: तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण

मध्य रेल्वेवर यापूर्वी रेल्वे स्थानकांवर पारंपारिक लॉकर या क्लाॅक-रुम सुविधा होती. मात्र, आता अद्ययावत सुविधा प्रवाशांना मिळत आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत जीडी लॉकरमध्ये ९१ हजार ५२७ बॅग आणि मौल्यवान साहित्य ठेवण्यात आले होते. यातून २६.१३ लाख रुपये महसूल मिळाला, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. डिजी लॉकरमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा, आरएफआयडी टॅग प्रवेश आणि ऑनलाइन माध्यम पावती आहे. सुमारे एक ते २४ तासांसाठी प्रति बॅग ३० रुपये दर आकारला जातो. तर, त्यानंतर पुढील प्रत्येक २४ तासांसाठी ४० रुपये दर आकारण्यात येतो.

Story img Loader