सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान अप-डाऊन माार्गावरची वाहतूक सुरु असली तरीही कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ट्रॅकवर पावसाचं पाणी आल्यामुळे ही वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. त्यातच शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानदारम्यान पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे रुळाखालची खडी वाहून गेली आहे. आज दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मध्य रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांना गरज असली तरच घराबाहेर पडण्याचं आव्हान केलं आहे.

सतत पडणारा पाऊस आणि रेल्वे रुळालगत साचलेल्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की ट्रॅकलगत असलेल्या सिग्नल यंत्रणांच्या मशिनरी पूर्णपणे उखडून केल्या आहेत. रेल्वेचे अधिकारी ही सेवा पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कल्याण-कर्जत मार्ग पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.