मनसेचे टोलविरोधी आंदोलन सुरू असून मंगळवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी वांद्रे वरळी सागरी सेतूवर आंदोलन केले. पोलिसांचा बंदोबस्त असूनही मनसे कार्यकर्त्यांनी घुडगूस घातला. याप्रकरणी १६ मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधी आंदोलन पुकारले असून त्याचे पडसाद राज्याच्या विविध टोल नाक्यावर पडत आहे. रविवार रात्री पासून राज्यातील २० टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. वांद्रे वरळी सागरी सेतूवर मंगळवारी दुपारी कॅप्टन मलिक यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी जमू लागले होते. पोलिसांनीही आपला बंदोबस्त वाढवला होता. परंतु पोलिसांना न जुमानता कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर धुडगूस घातला. पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी १६ जणांना अटक केली.राज ठाकरे यांचे वक्तव्य तपासून पहात आहोत असे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी स्पष्ट केले.
राज यांचे आता टोल ‘फोड’ के बोल!
मनसे आणि टोल..
टोल रद्द करता येणार नाही – अजित पवार
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
सागरी सेतूवरील टोल नाक्यावर मनसेचा धुडगूस
'राज'आदेशानंतर राज्यभरात सुरू असलेली 'टोल'फोडीचे प्रकरण आजही (मंगळवार) सुरूच आहे. मुंबईतील महत्वाच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्याची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी पंधरा ते वीस मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 29-01-2014 at 02:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerays party workers vandalise toll booth at bandra worli sea link