‘लोकसत्ता’चे नवे प्रकाशन असलेल्या वर्षवेध या वार्षिकीला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, प्रसिद्धीनंतर अवघ्या दोनच दिवसांत वर्षवेधचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. हा अंक न मिळाल्याने निराश झालेल्या वाचकांसाठी ही खूशखबरच आहे.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या वार्षिक अंकाला अल्पावधीतच प्रचंड मागणी आली. त्यामुळेच वाचकांच्या पसंतीला उतरलेल्या या वार्षिक अंकाच्या आणखी काही प्रती उपलब्ध करून देण्याचा निर्णय एक्स्प्रेस वृत्तसमूहाने घेतला. ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘वर्षवेध’च्या पहिल्यावहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच ‘वर्षवेध’च्या प्रतीसाठी आगाऊ नोंदणी झाली होती. प्रकाशनानंतर या अंकाच्या मागणीत आणखी वाढ झाली. परिणामी उपलब्ध प्रती हातोहात संपल्या! या पाश्र्वभूमीवर राज्यभरातील आमच्या वाचकांना ‘वर्षवेध’ची प्रत उपलब्ध व्हावी यासाठी आणखी काही प्रती पुनर्मुदित निर्णय घेण्यात आला आहे. आज, शनिवारपासून या प्रती सर्वत्र उपलब्ध असतील, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
मराठीत नवा पायंडा!
‘आपले मंगळयान अवकाशात कधी झेपावले?’ ‘एडवर्ड स्नोडेन कोण होता/आहे?’ ‘सचिनने नेमकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली?’ या प्रश्नांची उत्तरं पटकन आठवतात..? नाही ना? गेल्या वर्षभरातील महत्त्वाच्या घटना अशा पटकन आठवत नाहीत. या पाश्र्वभूमीवर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या महिन्यात नेमकी कोणती घटना घडली, त्याचे काय पडसाद उमटले याची सविस्तर माहिती ‘लोकसत्ता’ने ‘वर्षवेध’ या वार्षिक अंकात उपलब्ध करून दिली आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीत ही संकल्पना तशी नवीनच असल्याने ‘वर्षवेध’ खऱ्या अर्थाने ‘ट्रेण्ड सेटर’ ठरला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
वाचकांच्या मागणीची मोहोर ; ‘वर्षवेध’ हवासा सर्वाना!
‘लोकसत्ता’चे नवे प्रकाशन असलेल्या वर्षवेध या वार्षिकीला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, प्रसिद्धीनंतर अवघ्या दोनच दिवसांत वर्षवेधचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे.
First published on: 18-01-2014 at 03:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers high demand for loksatta varsavedh 2013 book