मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील जुन्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. रविवार,२२ मेपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला (सकाळी ६ पासून)  करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएमआरडीसी) दिली आहे. त्यामुळे या पट्टय़ात वाहतूक कोंडीतून चालकांची सुटका होणार आहे.

एमएसआरडीसीकडून बांधण्यात आलेल्या पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल नादुरुस्त झाला आहे. पुलाचे बेअिरग आणि  एक्स्पान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याची गरज निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेत तीन महिन्यांपूर्वी दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. २०० बेअिरगपैकी १४८ बेअिरगचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्स्पान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी उड्डाणपूल पूर्णत: बंद ठेवणे गरजेचे होते. त्यानुसार वाहतूक पोलिसांची परवानगी घेत १३ मेपासून कामाला सुरुवात करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उड्डाणपूल २४ मेपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात येणार होता. पूल बंद असल्याने १३ मेपासून विक्रोळी ते घाटकोपरदरम्यानच्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालक, प्रवाशांना प्रवासासाठी बराच वेळ मोजावा लागत असे. यातून वाहनचालकांची सुटका झाली आहे.