सोमवापर्यंत पाचशेहून अधिक वेळा प्रवाशांकडून सायकलचा वापर

मुंबई : मेट्रो स्थानकापर्यंत पोहचणे आणि स्थानकातून ईप्सित स्थळ गाठण्यासाठी जागृती नगर मेट्रो स्थानकाबाहेर आठवडय़ाभरापूर्वी सुरू केलेल्या सायकल सुविधेचा लाभ पाचशेहून अधिकवेळा वापर झाला असून, रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्वाधिक प्रतिसाद होता.

‘माय बाईक’ या स्टार्टअपद्वारे ‘स्टेशन अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड मोबिलिटी प्रोग्राम (स्टॅम्प) या अंतर्गत ही पथदर्शी प्रकल्प म्हणून ही सुविधा २३ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली.  सायकल भाडय़ाने मिळण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर पहिल्या तीनचार दिवसात त्यास मर्यादित प्रतिसाद होता. मात्र त्यानंतर त्यामध्ये वाढ झाली.

माय बाईकने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवापर्यंत पाचशेहून अधिक वेळा प्रवाशांनी सायकलचा वापर केला. विशेष म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्वाधिक १७० म्हणजे  राईड्स झाल्या आहेत. तसेच आत्तापर्यंत २९० प्रवाशांनी माय बाईक अ‍ॅप डाऊनलोड करून अनामत रक्कम भरून नोंदणी केली आहे.

घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो १ च्या मार्गिकेवर जागृती नगर स्थानकाबाहेर सध्या ही सेवा सुरू करण्यात आली असली, तरी लवकरच इतर स्थानकांवरदेखील ही सेवा सुरू करावि यासाठी माय बाईकने प्रशासनास प्रस्ताव पाठवला आहे. सध्या जागृती स्थानकाबाहेर ५० सायकली भाडय़ाने उपलब्ध आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो स्थानकापर्यंतचे आणि स्थानकातून ईप्सित स्थळापर्यंतचे प्रवाशांचे दळणवळण सुकर होण्यासाठी ‘स्टेशन अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड मोबिलिटी प्रोग्राम’ (स्टॅम्प) या उपक्रमांतर्गत अनेक स्टार्टअप्स आणि खासगी आस्थापनांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जुलै महिन्याच्या अखेरीस केले होते.

त्यामध्ये आलेल्या ८० प्रस्तावांपैकी आबरे एआय, ऑल माईल्स आणि माय बाईक या स्टार्टअपच्या प्रस्तावांना नोव्हेंबरमध्ये पथदर्शी योजना म्हणून मान्यता मिळाली दिली होती. घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो १ मार्गावर या योजना राबविण्यात येणार असून, त्यापैकी माय बाईक ही योजना मागील आठवडय़ात कार्यान्वित झाली.

प्रतितास दोन रुपये

प्रतितास दोन रुपये या दराने ही सायकल उपलब्ध असून, साप्ताहिक पास २८० रु. आणि मासिक पास ९०० रु.मध्ये दिला जात असून, दोन महिन्याच्या पासवर एक महिना मोफत सायकल भाडय़ाने घेता येते. तसेच साप्ताहिक आणि मासिक पासच्या काळात सायकल घरी घेऊन जाता येते. जीपीसी प्रणालीने जोडलेली ही सायकल ‘माय बाईक’ या अ‍ॅपद्वारे भाडय़ाने घेता येते. अ‍ॅपच्या वॉलेटमध्ये किमान ५०० रुपये शिल्लक असावी लागेल.