scorecardresearch

Premium

काळबादेवीतील रस्त्याला गुन्हेगाराचे नाव? नामकरणाची प्रक्रिया अनधिकृत, पालिका कार्यलयाकडे तक्रार

ज्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे त्याची पार्श्वभूमी गैरकृत्यांची असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

Road Kalbadevi named person unofficially, Shiv Sena's Shinde group lodged written complaint mumbai
काळबादेवीतील रस्त्याला गुन्हेगाराचे नाव ? नामकरणाची प्रक्रिया अनधिकृत, पालिका कार्यलयाकडे तक्रार (संग्रहित छायाचित्र)

मुंबई: काळबादेवीतील एका रस्त्याला अनधिकृतपणे एका व्यक्तीचे नावे देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने या प्रकरणी पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. ज्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे त्याची पार्श्वभूमी गैरकृत्यांची असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथील विठोबा लेन परिसरात किशोरभाई पन्नालाल सागर चौक अशी पाटी लावली आहे. मात्र ही पाटी अनधिकृतपणे लावण्यात आल्याची तक्रार शिवेसेनच्या शिंदे गटाचे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाकडे केली आहे. मुंबईतील कोणत्याही रस्त्याला नाव द्यायचे असले तर त्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. नगरसेवकांनी पत्र दिल्यानंतर प्रशासन त्या नावाचा विचार करून त्यावर अभिप्राय देत असते. ज्याचे नाव द्यायचे आहे त्याचा पूर्वेतिहास तपासला जातो, त्यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक योगदान किती आहे ते तपासले जाते. त्यानंतर पालिकेच्या स्थापत्य समितीने आणि सभागृहाने त्या ठरावाला मंजुरी दिल्यानंतरच रस्त्याच्या नामकरणाची पाटी लावली जाते. मात्र विठोबा लेन येथे ही कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

29 villages dispute in Vasai-Virar
वसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना
high-court
बीज दात्यासह सरोगसी प्रक्रिया करण्यास दोघा दामप्त्यांना उच्च न्यायालयाची परवानगी; सुधारित कायद्यामुळे प्रक्रिया रखडली होती
police solve murder mystery of woman whose body found at tik tok point in shivdi
महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात शिवडी पोलिसांना यश; झुडूपांमध्ये सापडला मृतदेह
bombay hc refuse anticipatory bail to man accused of marrying five women
फसवणूक करून पाच महिलांशी लग्न करणे महागात पडले; आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

हेही वाचा… मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ३४ टक्के अतिरिक्त पोलीस; मुंबई वाहतूक पोलिसांकडे ३४ टक्के जागा रिक्त

किशोर सागर हे नाव काही गुन्हेगारी कृत्यांशी जोडले गेल्याची चर्चा या परिसरात आहे. तसेच लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत, असे आरोप तक्रारदान नाईक यांनी केले आहेत. या नामकरणाला परिसरातील काही रहिवाशांचा प्रचंड विरोध आहे तर काहींचा पाठिंबा आहे. ज्यांचे नाव आहे तेही एका राजकीय पक्षाशी संबंधित होते.

पालिकेला पत्ताच नाही

याबाबत विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबद्दल काहिच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र फलक अनधिकृत असल्यास तो तातडीने हटवला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Road in kalbadevi has been named after a person unofficially shiv senas shinde group has lodged a written complaint mumbai print news dvr

First published on: 29-11-2023 at 17:07 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×