प्रसिद्ध पर्यटन कंपनी ‘सचिन ट्रॅव्हल्स’चे कार्यकारी संचालक सचिन जकातदार यांचे दीर्घ आजाराने बुधवारी मुंबईत जे.जे. रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
गेल्या २६ एप्रिल रोजी जकातदार यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंडे आणि अन्य अवयव हळूहळू निकामी होत गेल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. जकातदार यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दादर येथील साने गुरुजी विद्यालयात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी सातनंतर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘सचिन ट्रॅव्हल्स’चे सचिन जकातदार यांचे निधन
प्रसिद्ध पर्यटन कंपनी ‘सचिन ट्रॅव्हल्स’चे कार्यकारी संचालक सचिन जकातदार यांचे दीर्घ आजाराने बुधवारी मुंबईत जे.जे. रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.

First published on: 09-07-2015 at 01:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin travel executive director sachin jakatdar passes away