Toilet Scam Case : शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. त्यांच्याविरोधात अजमीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शिवडी न्यायालयाने हे वॉरंट काढलं आहे.

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी घेतली होती. आता २४ जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.