मुंबई : क्रिकेट खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार मुंबईत घडला. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर अल्पवयीन आरोपीची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१० ऑगस्टला गैरप्रकार घडला असून याप्रकरणी याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, पीडित मुलगा क्रिकेट खेळत होता. त्यावेळी तेथील गोदामात चेंडू गेला.
मुलगा चेंडू आणण्यासाठी तेथे गेला असता १६ वर्षीय आरोपीने त्याला जबरदस्तीने गोदामातील छोट्या खोलीत नेले व त्याच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यानंतर पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाला डोंगरी बालसुधारगृहात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.