मुंबई : शीव रुग्णालयाच्या परिसरात एका महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शव विच्छेदन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे यांची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणाचे पुरावे जमा करण्यात पोलिसांना खूप त्रास झाला होता. त्यामुळे जामिनीवर असलेले डॉक्टर ढेरे यांच्याकडून सर्व पुरावे नष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना रुग्णालय प्रवेशास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शीव रुग्णालयाच्या परिसरात शुक्रवारी रात्री डॉ. राजेश ढेरे यांच्या गाडीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण मिळवण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. अपघातानंतर १८ तासांनी डॉ. ढेरे यांनी अटक करण्यात आली होती. मात्र डॉ. ढेरे यांची जामिनावर सुटका झाली आहे. ढेरे यांचा रुग्णालयातील वावर वाढल्यास अपघातासंदर्भातील पुरावे त्यांच्याकडून नष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोपी असलेले डॉ. ढेरे यांना रुग्णालयात येण्याची बंदी घालावी आणि त्यांना कोणतीही जबाबदारी देऊ नये. अन्यथा पुरावे नष्ट होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा – मुंबईत आज हलक्या पावसाची शक्यता

हेही वाचा – यंदा वाढदिवसालाच डेक्कन क्वीन रद्द, मुंबई – पुणे प्रवाशांचे हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात मृत्यू झालेली महिला ही गरीब कुटुंबातील असल्याने तिच्या कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा आहे, या विषयांत निष्पक्ष आणि कुठल्याही दबावाशिवाय चौकशी व्हावी, तसेच पोलिसांना सर्व पुरावे वेळेत मिळावेत यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी अशी विनंती रवी राजा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.