केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आयजीसीएसई आणि आयबी या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या शाळांमध्ये शिकविण्यात येणार असून त्यासाठी विधिमंडळ सदस्यांचा ठराव या अधिवेशनात करण्यात येणार असून तो केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शाळांमधील नर्सरी प्रवेशासाठी शासनाने धोरण आखण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत यशोमती ठाकूर, अमिन पटेल, अस्लम शेख आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. त्याला उच्चर देताना त्यांनी ही माहिती दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2016 रोजी प्रकाशित
केंद्रीय शाळांमध्येही शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविणार
केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आयजीसीएसई आणि आयबी या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-03-2016 at 01:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji maharaj history will teaching in central government school vinod tawde