तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आली.

Nawab Malik ED Inquiry live : दाऊद इब्राहिम कनेक्शन ; आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ‘ईडी’कडून अटक

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपा नेत किरीट सोमय्या यांनी इशारा दिला आहे. “अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिकांनंतर आता पुढचा नंबर…”

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही ही लढाई जिंकू असं म्हटलं आहे. “संपूर्ण देश पाहत असून त्यांना काय सुरु आहे याची माहिती आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये काय सुरु आहे हे संपूर्ण देश पाहत आहे. ही कायदेशीर आणि राजकीय लढाई असून आम्ही लढू,” असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

अटकेच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी प्रतिक्रिया दिली. अटक केल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर गाडीमध्ये बसताना नवाब मलिक यांना पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी, “लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे,” असं म्हटलं.

तर अटकेनंतर नवाब मलिक यांच्या अधिकृत कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ‘झुकुंगा नाही’ असं अटकेच्या कारवाईनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर येतानाचा फोटो ट्विट करत म्हटलंय. या फोटोमध्ये नवाब मलिक ईडीच्या कारयालयाबाहेर पडताना हाताची मूठ आवळून हात उंचावताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून आंदोलनही करण्यात आलं. ईडीकडून चौकशी सुरु असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. यादरम्यान दुपारी ३ च्या सुमारास ईडीने नवाब मलिक यांना अटक केली.